पावसाळी अधिवेशन संपून एक महिना उलटलेला असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यानी विधानसभेत दिलेले एकही आश्वासन अजून पूर्ण केले नसल्याचा आरोप काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यानी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे.
मुख्यमंत्री जनतेप्रती पूर्णपणे असंवेदनशील बनले असून त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने ऐन चतुर्थी काळात लोकांना हाल अपेष्टा सहन करण्यास भाग पाडल्याचा आरोप चोडणकर यानी केला आहे. अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या गोमंतकीयांना सणासुदिच्या दिवसांत रस्त्यावरील खड्डे, खंडित वीज पुरवठा आदीमुळे यातना सहन कराव्या लागल्या. लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारने पावले न उचलल्याचा आरोपही चोडणकर यानी केला आहे.