मुख्यमंत्री बदलून भाजपकडून विश्‍वासघात : राष्ट्रवादी

0
145

गोव्यातील जनतेने मनोहर पर्रीकर यांना मुख्यमंत्री म्हणून निवडून दिले होते. आता त्यांच्या जागी दुसर्‍याची मुख्यमंत्री म्हणून निवड करून भाजपने गोव्यातील जनतेचा विश्‍वासघात केल्याचा आरोप काल राष्ट्रवादी कॉंग्रेसने येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला. वरील कृतीद्वारे भाजपने लोकशाहीत मुख्यमंत्र्याना जे अधिकार बहाल केलेले आहेत त्यावर गदा आणण्यात आल्याचा आरोप पक्षाचे मुख्य प्रवक्ते व उपाध्यक्ष ट्रॉजन डिमेलो यांनी केला. नवनिर्वाचित मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे भाजपमध्ये पक्षश्रेष्ठी नाहीत असे म्हणत होते. पण त्यांचे ते म्हणणे खोटे होते हे आता सिद्ध झाल्याचे ट्रॉजन म्हणाले. आपण हिंदू ख्रिश्‍चन असल्याचे सांगणार्‍या फ्रान्सिस डिसोझा यांना आपण अल्पसंख्यकांचा नेता असल्याचे सांगून मुख्यमंत्रीपदी वर्णी लावावी असे सांगण्याचा अधिकारच नव्हता. आपण अल्पसंख्यांकांचे हित जपणारा नेता आहे हे फ्रान्सिस डिसोझा यांचे म्हणणे खोटे असल्याचा आरोपही डिसोझा यांनी केला.
पर्रीकर सरकारने राज्यात अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना करण्याचे आश्‍वासन दिले होते. पण अद्याप त्यांची पूर्तता करण्यात आली नसल्याचे डिमेलो म्हणाले.