मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पोटात त्रास जाणवल्याने उपचारार्थ मुंबई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यावर लीलावती हॉस्पिटलमधील डॉ. जगन्नाथ यांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुखमंत्री पर्रीकर आगामी दोन दिवस नागरिकांना भेटीसाठी उपलब्ध असणार नाहीत, असे त्यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांना बुधवारी दुपारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पोटात त्रास जाणवू लागला. त्यानंतर मुख्यमंत्री पर्रीकर यांनी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये तपासणी करून घेतली होती. अन्नातून विषबाधा झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. गोमेकॉतील डॉक्टरांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांना मुंबईत तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला, असे सूत्रांनी सांगितले. मुखमंत्री पर्रीकर यांना गुरूवारी मुंबईला लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत. त्याची प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री पर्रीकर यांची लिलावती हॉस्पिटलमध्ये पूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी लिलावतीमध्ये यापूर्वीही वैद्यकीय तपासणी करून घेतलेली आहे.