विधानसभा वृत्त

0
170

तेरेखोल पुलासाठी आवश्यक परवाने घेतले : मुख्यमंत्री
एनडीझेड विभागात पुलांच्या बांधकामास परवानगी आहे. त्यामुळे तेरेखोल पुलासाठी आवश्यक ते सर्व परवाने सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत आमदार ऍलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी विचारलेल्या प्रश्‍नावर दिली. मेसर्स एस. एन. भोबे आणि असोसिएशन प्रा. लिमिटेड ही या पुलासाठी सल्लागार संस्था म्हणून नियुक्त केल्याची माहिती त्यांनी दिली. हा पूल जनतेसाठी महत्वाचा असल्याचे त्या भागाचे आमदार या नात्याने आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.
तेरेखोल जनतेने यापूर्वी या पुलासाठी मागणी केली होती. आता तेथील जमिनी हडप करण्यास सुरूवात केल्याने लोकांचा पुलाला विरोध असल्याचे लॉरेन्स यांनी सभागृहाला सांगितले. आमदार विजय सरदेसाई यांनीही याबाबत प्रश्‍न विचारून मुख्यमंत्र्यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला.
जप्त केलेल्या लाकडांचा निकालानंतरच लिलाव
वनखात्याने जप्त केलेले लाकूड योग्य पद्धतीने ठेवले जाते. प्रकरणे निकालात काढल्याशिवाय त्यांची लिलावावर विक्री करणे शक्य नसते, असे वनमंत्री एलिना साल्ढाणा यांनी काल आमदार ग्लेन टिकलो यांच्या प्रश्‍नावर सांगितले.