मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणास अखेर मंजुरी

0
0

व्वूर राणाला भारतात आणण्यात येणार आहे. अमेरिकेच्या न्यायालयाने भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. राणाला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

15 ऑगस्ट 2024 रोजी राणाने प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध अपील केले होते, जे जिल्हा न्यायालयाने फेटाळले. दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार त्याला भारतात पाठवले जाऊ शकते, असे अमेरिकन न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते. मुंबई हल्ल्याच्या 405 पानांच्या आरोपपत्रात आरोपी म्हणून राणाच्या नावाचाही उल्लेख आहे. त्यानुसार राणा हा आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आहे. आरोपपत्रानुसार राणा हल्ल्याचा मुख्य आरोपी डेव्हिड कोलमन हेडली याला मदत करत होता.

26 नोव्हेंबर 2008 रोजी लष्कर-ए-तैयबाच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. त्यापैकी 166 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 300 जण जखमी झाले होते. मृतांमध्ये काही अमेरिकन नागरिकांचाही समावेश होता. या चकमकीत पोलिसांनी 9 दहशतवाद्यांना ठार केले आणि अजमल कसाबला अटक केली होती. त्याला 2012 मध्ये फाशी देण्यात आली होती.

मुंबई हल्ल्याची ब्ल्यू प्रिंट तयार केली होती
मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रानुसार राणा दहशतवाद्यांना हल्ल्याचे ठिकाण आणि भारतात आल्यानंतर राहण्याची ठिकाणे सांगून मदत करत होता. राणानेच ब्लू प्रिंट तयार केली होती, ज्याच्या आधारे दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. राणा आणि हेडलीवर दहशतवादी कट रचल्याचा आरोप होता. मुंबई हल्ल्याचा कट रचण्यात राणाचा मोठा हात होता, असे आरोपपत्रात म्हटले आहे.