मुंबई सिटी-पुणे एफसी झुंज आज

0
105

कोलकात्यातील शुभारंभी सामन्यात ऍटलेटिको दे कोलकाताकडून हार पत्करावी लागलेला यजमान मुंबई सीटी एफसी संघ आज येथील आज येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार्‍या पुणे एफसीविरुध्दच्या लढतीत आपली आपली इंडियन सुपर लीग मोहीम रुळावर आणण्याचा प्रयत्न करील.बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि चार्टर्ड अकाऊंटंट बिमल पारेख यांच्या सहमालकीतील मुंबई एफसी संघ शुभारंभी सामन्यात विशेष चमक दर्शवू शकला नाही पण त्यापासून बोध घेत स्वगृहीच्या मुकाबल्यात योग्य लय साधण्यास उत्सुक असेल. ‘मर्की प्लेयर’ फ्रेडी ल्‌जनगबर्ग (स्वीडन) आणि निकोलस अनेलका (फ्रान्स) याच्या अनुपस्थितीतही मुंबई एफसीने कोलकातविरुध्दच्या सामन्यात ५७ टक्के नियंत्रण राखले होते आणि प्रतिस्पर्ध्यांच्या गोलवर अधिक फटकेही लगावले पण सुदैवाची साथ लाभली नाही. पहिल्या सामन्यातील सकारात्मकतेपासून बोध घेत यजमान संघ आपला ठसा उमटविण्याचा प्रयत्न करील आणि स्वगृहीच्या या लढतीत ल्‌जनबर्ग खेळण्याची अपेक्षाही असेल. फुटबॉल शौकिनांसाठी डीवाय पाटील स्टेडियमवर नूतनीकरण करण्यात आलेले असून मुंबईकराना हा सामना अविस्मरणीय अनुभव ठरण्याची अपेक्षा आहे.
दिल्ली डायनामोजविरुध्दची शुभारंभी लढत गोलशून्य राखलेल्या पुणे एफसीविरुध्दच्या या लढतीत मुंबईचे प्रशिक्षक पीटर रीड यजमानांविरुध्द कसे डावपेच आखता यावरही बरेच अवलंबून असेल. पहिल्या सामन्यात जायबंदी झाल्याने तीन आठवडे स्पर्धेबाहेर गेलेल्या कर्णधार सय्यद रहिम नबीच्या अनुपस्थितीमुळे जर्मनीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू मानुएल फ्रेडरिचला कर्णधारपदाची जबाबदारी वहावी लागेल. नवा खेळाडू आंद्रे मोरित्झही उपलब्ध असेल. मुंबई एफसीची स्पर्धेंतील एकंदर व्युव्हरचना पाहता गोलरक्षक सुब्रता पॉलची भूमिका पुन्हा एकदा महत्वपूर्ण ठरेल.