मुंबई समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू

0
4

मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल ही प्रवासी बोट गेट वे ऑफ इंडियाजवळ काल बुधवारी सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. या घटनेत तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये तीन नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. नौदलाच्या बोटीने नीलकमल या बोटीला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या बोटमधून 101 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे.

या बोटीला नेव्हीच्या स्पीड बोटने या बोटीला धडक दिली आणि हा भीषण अपघात घडला. या बोटेतून 100 पेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करत होते. ही दुर्घटना घडल्यानंतर लगेचच तातडीने मदतकार्य करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत नौदलाकडून आणि पोलिसांच्या समन्वयाने बचाव कार्य सुरू होते.