मुंबई इंडियन्स- चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीची लढत

0
138

>> आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर

इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामाची सुरुवात १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे. या हंगामाचे वेळापत्रक बीसीसीआयने काल जाहीर केले आहे. या हंगामातील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात अबुधाबी येथे पार पडणार आहे.

१९ सप्टेंबर ते ३ नोव्हेंबर पर्यंत या आयपीएल हंगामातील साखळी सामने होणार आहेत. त्यानंतर प्लेऑफचे सामने सुरु होतील. प्लेऑफच्या सामन्यांचे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही. अंतिम सामना १० नोव्हेंबरला होणार असल्याचे बीसीसीआयने यापूर्वीच जाहीर केले होते. यावेळी पहिल्यांदाच आयपीएलचा अंतिम सामना रविवारी होणार नाही. याआधी प्रत्येक आयपीएल हंगामाचा अंतिम सामना रविवारी झाला आहे.

तसेच यावर्षी आयपीएलमध्ये १० डबल हेडर (एका दिवसात दोन सामने) होणार आहेत. डबल हेडरच्या दिवशी दुपारचे सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार ३.३० वाजता सुरु होतील आणि संध्याकाळचे सामने ७.३० वाजता सुरु होतील. तसेच आयपीएलचा हा १३ वा मोसम यावर्षी ५३ दिवसांचा असणार आहे. तसेच सर्व सामने अबुधाबी, शारजा आणि दुबई या ३ ठिकाणी होतील. अबुधाबीमध्ये २०, दुबईमध्ये २४ आणि शारजामध्ये १२ सामने होणार आहेत.