विद्यमान विजेता मुंबई इंडियन्स आणि दोनवेळच्या जेत्या चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात वानखेडे स्टेडियमवर होणार्या लढतीद्वारे शनिवारी ७ एप्रिल रोजी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) ११व्या पर्वाला प्रारंभ होणार आहे. जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि स्पर्धात्मक टी -२० स्पर्धा असलेल्या आयपीएलच्या या ११व्या पर्वांत ५१ दिवसांत ९ ठिकाणी सामने खेळविले जाणार आहे. यंदाच्या पर्वात १२ सामने सायंकाळी ४ वा. तर ४८ सामने रात्री ८ वाजता सुरू होतील. क्वालिफायर १ आणि क्वालिफायर २ चा विजेता संघ अंतिम सामन्यात रविवारी वानखेडे स्टेडियमवर २७ मे, २०१८ रोजी खेळणार आहे.