
>> दिल्लीकडून ११ धावांनी पराभूत
ऋषभ पंतची शानदार अर्धशतकी खेळी आणि संदीप लामिछाने, अतिम मिश्रा व हर्षल पटेलच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली डेअरडेविल्स संघाने गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघावर ११ धावांनी मात करीत दिलासादायी विजय मिळविला. पराभवामुळे मुंबई इंडियन्सच्या बाद फेरीतील प्रवेशाच्या आशा संपुष्टात आल्या.
दिल्लीकडून मिळालेल्या १७५ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला १९.३ षट्कांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात १६३ धावांपर्यंत मजल मारता आली. इविन लेविस (४८), हार्दिक पंड्या २७ आणि बेन कटिेेंग (३७) वगळता इतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात अपयश आल्याने मुंबईचे आव्हान यंदा क्लॉलिफायर फेरीपूर्वीच संपुष्टात आले. दिल्लीतर्फे संदीप लामिछाने, हर्षल पटेल व अमित मिश्रा यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना ऋषभ पंतच्या आकर्षक अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली डेअरडेविल्स संघाने ४ गडी गमावत १७४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. पृथ्वी शॉ ग्लेन मॅक्सवेल आणि श्रेयस अय्यर हे तिघे ठराविक अंतरात तंबूत परतले. चौथ्या षटकात मुस्तफिजूर रहमानच्या चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात पृथ्वी शॉ (८ चेंडूत १२ धावा) धावबाद झाला. शॉ पाठोपाठ मॅक्सवेलही बाद झाला. बुमराहने त्याचा (१८ चेंडुत २२ धावा) त्रिफळा उडवला. कर्णधार श्रेयस अय्यरला मार्कंडेने स्वस्तात टिपले. अय्यरला ६ धावाच करता आल्या. ऋषभ पंतने विजय शंकरच्या साथीत दमदार भागीदारी करीत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. ऋषभ पंतने आपली लय कायम राखताना ४ चौकार व ४ षट्कारांच्या सहाय्याने ६४ धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. अष्टपैलू विजय शंकरने ३० चेंडूत ३ चौकार व २ षट्कारांनिशी नाबाद ४३ धावांचे योगदान दिले. अभिषेक शर्माने नाबाद १५ धावा जोडल्या. मुंबईतर्फे जसप्रीत बुमराहने ३ तर हार्दिक पंड्या व बेन कटिंग यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
धावफलक
दिल्ली डेअरडेविल्स ः पृथ्वी शॉ धावचित (हार्दिक पंड्या) १२, ग्लेन मॅक्सवेल त्रिफळाचित गो. जसप्रीत बुमराह २२, श्रेयस अय्यर झे. कृणाल पंड्या गो. मकरंद मार्कंडे ६, ऋषभ पंत झे. कीरॉन पोलार्ड गो. कृणाल पंड्या ६४, विजय शंकर नाबाद ४३, अभिषेक शर्मा नाबाद १५.
अवांतर ः १२. एकूण २० षट्कांत ४ बाद १७४ धावा.
गोलंदाजी ः कृणाल पंड्या २/०/११/१, जसप्रीत बुमराह ४/०/२९/१, हार्दिक पंड्या ४/०/३६/०, मुस्तफिजुर रेहमान ४/०/३४/०, मयंक मार्कंडे २/०/२१/१, बेन कटिंग ४/०/३६/०.
मुंबई इंडियन्स ः सूर्यकुमार यादव झे. विजय शंकर गो. संदीप लामिछाने १२, इविन लेविस यष्टिचित ऋषभ पंत गो. अमित मिश्रा ४८, ईशान किशन झे. विजय शंकर गो. अमित मिश्रा ५, कीरॉन पोलार्ड झे. ट्रंेंट बौल्ट गो. संदीप लामिछाने ७, रोहित शर्मा झे. ट्रेंट बौल्ट गो. हर्षल पटेल १३, कृणाल पंड्या झे. राखीव (तेवाटिया) गो. संदीप लामिछाने ४, हार्दिक पंड्या झे. राखीव (तेवाटिया) गो. अमित मिश्रा २७, बेन कटिंग झे. ग्लेन मॅक्सवेल गो. हर्षल पटेल ३७, मयंक मार्कंडे त्रिफळाचित गो. ट्रेंट बौल्ट ३, जसप्रीत बुमराह झे. ट्रेंट बौल्ट गो. हर्षल पटेल ०, मुस्तफिजुर रेहमान नाबाद ०.
अवांतर ः ७. एकूण १९.३ षट्कांत सर्वबाद १६३ धावा.
गोलंदाजी ः संदीप लामिछाने ४/०/३६/३, ट्रेंट बौल्ट ४/०/३३/१, ग्लेन मॅक्सवेल २/०/१९/०, हर्षल पटेल २.३/०/२८/३, लियाम प्लंकेट ३/०/२७/०, अमित मिश्रा ४/०/१९/३.