मुंबईसह १३ शहरांत पहिल्यांदा ५ जी सेवा

0
15

केंद्र सरकारने ५ जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी दिल्यानंतर दूरसंचार विभागाने लिलावासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार, देशभरात १३ शहरात सर्वात आधी ५ जी सेवा उपलब्ध होणार आहे. या १३ शहरांमध्ये मुंबई, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू, चंडीगढ, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ या शहरांचा समावेश आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, २६ जुलै २०२२ रोजी ५ जी स्पेक्ट्रमचा लिलाव होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने ९ स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची योजना आखली आहे. ५ जी सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचा सरकारचा मानस असून, देशात सर्वात आधी १३ शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. देशात सर्वात आधी कोणती टेलिकॉम कंपनी कमर्शिअल पद्धतीने ५ जी सेवा सुरू करेल, याबाबत आत्ताच ठोसपणे सांगणे कठीण आहे.