इंडिया या नव्याने स्थापन झालेल्या विरोधी आघाडीची तिसरी बैठक 25 ते 26 ऑगस्ट दरम्यान मुंबईत होणार आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) हे संयुक्तपणे या बैठकीचे आयोजन करणार आहेत.
नवीन आघाडी स्थापनेनंतर ही पहिलीच वेळ आहे की, ज्या राज्यात त्यांचा एकही सदस्य पक्ष सत्तेत नाही, अशा राज्यात सर्व 26 विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. खरे तर महाराष्ट्रात भाजप-शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित गट) यांचे सरकार आहे. यापैकी कोणीही इंडिया आघाडीचा भाग नाही.