मुंबईत ओमिक्रॉनचे आणखी दोन बाधित

0
15

कल्याण-डोंबिवलीत ओमिक्रॉनची लागण झालेला रुग्ण सापडल्यानंतर मुंबईत आणखी दोघांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. यासह महाराष्ट्रातील एकूण ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या आता १० वर पोहोचली आहे.

ज्या दोघांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे, त्यांनी फायझर लशीचे डोस घेतले असल्याची माहिती मिळत आहे. मात्र हे दोघे आतापर्यंत ३२० जणांच्या संपर्कात होते, ही अधिक चिंता वाढवणारी बाब आहे. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथून दिनांक २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत आलेल्या या ३७ वर्षीय पुरुषाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे.

तसेच या रुग्णासोबत राहिलेल्या आणि २५ नोव्हेंबरला अमेरिकेतून आलेल्या त्याच्या ३६ वर्षीय मैत्रिणीला देखील या विषाणूची बाधा झाल्याचे प्रयोगशाळा अहवालातून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या दोघांना कोणतीही लक्षणे नसून, ते रुग्ण सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार घेत आहेत.