मुंबईतील २२ मजली इमारतीला आग : एक मृत्यूमुखी

0
134

पश्‍चिम मुंबईतील लोटस बिझनेस पार्क या २२ मजली इमारतीला काल सकाळी आग लागल्यानंतर ती विझविण्याच्या कामात गुंतलेला अग्नीशामक दलाचा एक जवान मृत्यूमुखी पडला. तसेच सहाजण या दरम्यान गंभीर जखमी झाले आहेत. या आगीवर नियंत्रणासाठी ४० पाण्याचे बंब मागविण्यात आले. चारतासांच्या परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. आग विझविण्यासाठी गुंतलेल्या जवानांपैकी २० जवान व १३ अधिकारी २२व्या मजल्यावर अडकून पडले. त्यामुळे नौदलाच्या हेलिकॉप्टर्सना पाचारण करण्यात आले. त्याद्वारा नऊजणांना बाहेर काढण्यात आले. आग २१व्या मजल्यावर लागली होती.