मुंबईच्या युवकाचा चिरेखाणीत बुडून मृत्यू

0
22

शिनेर-चिंबल येथील चिरेखाणीत बुडून मुंबई येथील डॅरिक राज (18) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना 19 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी घडली होती. डॅरिक राज याचा मृतदेह तळ्याच्या पात्रात काल सकाळी 11.30 वाजता आढळून आला. मुंबई येथील डॅरिक या युवक चिंबल येथे आपल्या नातेवाईकाकडे आला होता. रविवारी संध्याकाळी चिरेखाणीत गेला होता. तळ्यात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो आतमध्ये बुडाला. या घटनेची माहिती मिळताच जुने गोवे अग्निशामक दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळ धाव घेतली आणि शोधकार्य सुरू केले होते. जुने गोवा पोलीस स्थानकाचे निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुदिन रेडकर यांनी घटनेचा पंचनामा केला असून, अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.