मिलिंद नाईक यांच्या प्रतिमेचे कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून दहन

0
14

महिला कॉंग्रेस आणि युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील महिला पोलीस स्थानकावर मोर्चा नेऊन तेथील अधिकार्‍यांना माजी मंत्री, आमदार मिलिंद नाईक यांच्याविरोधात महिलेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा न नोंदविल्याप्रकरणी जाब विचारला. तसेच कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस मुख्यालयाजवळ माजी मंत्री, आमदार मिलिंद नाईक यांच्या प्रतिमेचे दहन केले.

कॉंग्रेसचे नेते संकल्प आमोणकर यांनी एका महिलेवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी माजी मंत्री, मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांच्याविरोधात पणजी येथील महिला पोलीस स्थानकावर तक्रार दाखल केली आहे.
महिला पोलिसांनी माजी मंत्री नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल न केल्याने कॉंग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. कॉंग्रेसने या प्रकरणी न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे.