एमव्ही लकी-७ कॅसिनो जहाज वादळी पावसाच्या या मोसमात समुद्रात आणू नये, असे बंदर कप्तान ब्रागांझा यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते. पण त्यांचे म्हणणे ऐकून न घेता सदर जहाज समुद्रात आणण्यास मान्यता देऊन सरकारने संकट ओढवून घेतल्याचे आम आदमी पार्टीच्या पत्रकार परिषदेत कॅप्टन वेन्झी व्हियेगश यांनी सांगितले. अशा प्रकारे जेव्हा बोट भरकटते तेव्हा वायू तयार होतो आणि बोटीतील इंधनाची जर गळती झाली तर वायु व इंधनामुळे आग भडकून विस्कोटही होऊ शकतो, असे कॅप्टन व्हियेगश म्हणाले.
रिव्हर प्रिन्सेसमुळे कांदोळी किनार्याची वाट लागली. आता मिरामार किनार्याचीही तीच गत होण्याची शक्यता असल्याचे व्हियेगश म्हणाले. ही कॅसिनो बोट एमपीटी बंदरातून समुद्रात आणण्यास परवानगी देण्यापूर्वी सरकारने संभाव्य धोक्याचा अभ्यास करायला हवा होता, असे मतही त्यानी यावेळी मांडले. एल्विस गोम्स हे यावेळी म्हणाली की, पैशांच्या लालसेने सत्ताधार्यांनी या कॅसिनो बोटीला वादळी पावसात समुद्रात येण्यास मान्यता दिली. याबाबतीत सरकार अत्यंत बेजबाबदारपणे वागल्याचा आरोपही त्यानी केला.