केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यापैकी छत्तीसगढ आणि मिझोरममध्ये आज (दि. 7) मतदान होणार आहे. मिझोरममध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे, तर छत्तीसगढमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान मंगळवारी होणार आहे. त्यानंतर 17 नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यात छत्तीसगढमध्ये मतदान होईल. सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल.
छत्तीसगढमध्ये विधानसभेच्या 90 जागा असून, पहिल्या टप्प्यात 20 जागांवर मतदान होईल. दुसऱ्या टप्प्यात 70 जागांवर मतदान होईल. राज्यात दोन्ही टप्प्यांत मिळून 24,109 मतदान केंद्रे असणार आहेत.
मिझोरममध्ये एकाच टप्प्यात विधानसभेच्या 40 जागांसाठी मतदान होईल. 1276 मतदान केंद्रांवर 8,51,895 मतदार मतदानाचा हक्क बजावतील.