मिचौंग चक्रीवादळ आज धडकणार

0
13

बंगालच्या उपसागरावर तयार झालेले मिचौंग चक्रीवादळ मंगळवारी तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या समुद्र किनाऱ्यांवर धडक देईल. तत्पूर्वी रविवारपासूनच वादळाच्या प्रभावामुळे तमिळनाडूच्या किनाऱ्यावर वेगवान वारे वाहून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काल देखील या चक्रीवादळामुळे दक्षिण आणि पूर्व भारतातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. त्याचबरोबर चेन्नई विमानतळ बंद करण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीने आतापर्यंत 6 नागरिकांचा बळी घेतला आहे.