मिकी पाशेकोंविरोधातील खटला बंद करण्याचा आदेश

0
135

>> मनी लॉंडरिंग प्रकरण

माजी आमदार मिकी पाशेको यांच्याविरुद्ध गाजलेल्या मनी लॉंडरिंग प्रकरणातील खटला न्यायालयाने बंद करण्याचा आदेश काल दिला. तसेच सीबीआयने जप्त केलेली कागदपत्रे परत करण्याचा आदेशही जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला. ही दोन प्रकरणे दोन न्यायालयात चालू होती.

या निकालाबद्दल मिकी पाशेको यांनी समाधान व्यक्त करून न्यायालयाने योग्य निर्णय दिल्याचे सांगितले. गेल्या आठ वर्षांपासून या दोन्ही प्रकरणांमुळे आपल्याला बराच त्रास झाला. हे सर्व प्रकरण राजकीय हेतूने न्यायालयात नेऊन आपले खच्चिकरण करण्याचा प्रयत्न झाला. आता न्यायालयाने योग्य न्याय दिला असे मिकी पाशेको यांनी सांगितले.