>> फोंडा पोलिसांकडून तालुक्यात जागृती मोहीम
ङ्गोंडा शहर आणि तालुक्यात कोरोना रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत असून सरकार पातळीवर सध्या जनजागृती करण्यात येत आहे. ङ्गोंडा पोलिसांनी शहर तसेच बाजार परिसरात ध्वनिक्षेपक लावून कोरोना महामारीबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. प्रत्येकाने मास्क वापरण्याबरोबरच सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले. बाजार भागात मास्क न वापरल्याने ५३ जणांना पोलिसांनी यावेळी दंड ठोठावला. ङ्गोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कोरोना जागृती मोहीम राबवण्यात येत आहे.
ङ्गोंड्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या दोनशेपर्यंत पोचली असून वाढत्या कोरोना रुग्णांमुळे लोकांनी धसका घेतला आहे. मागच्या काळात लॉकडाऊन झाल्याने मोठी बिकट स्थिती निर्माण झाली होती. आताही तीच स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. कोरोनाचा वाढता ङ्गैलाव रोखण्यासाठी कोरोनासाठी जे काही सरकारी नियम व अटी आहेत, त्यांचे पालन करणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांबरोबरच ङ्गोंडा पालिकेकडूनही जनजागृती करण्यात येत असून ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आरोग्याधिकार्यांनी सांगितले.
दरम्यान, ङ्गोंडा तालुक्यातील रोमटामेळ पथकांनीही आवश्यक काळजी व खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. काल कोटवाडा येथे झालेल्या मुस्लीम समाजाच्या उत्सवावेळी गर्दी होती. मात्र, पोलिस व नगरसेवक तसेच पंचायत सदस्यांनी यावेळी उपस्थितांना परिस्थितीची जाणीव करून दिली. ङ्गोंडा बसस्थानक तसेच बाजार भागात विशेषतः आठवडी बाजारात गर्दी होत असून लोकांनी आवश्यक काळजी घ्यावी अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.