>> कुंभारजुवे, बेतकी, खांडोळ्यात पाणी नाही
माशेल, तिवरे येथे पेट्रोलपंपाजवळ एका बिल्डरचे कंन्ट्रक्शन काम चालू आहे. या बिल्डरकडून खोदकाम चालू असताना कुंभारजुवा, जुवे, बेतकी, माशेल, खांडोळा भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी तुटली. त्यामुळे कुंभारजुवा, जुवे, बेतकी भागाला कालपासून पाणीपुरवठा बंद झाला आहे. गेल्या आठ दहा दिवसापूर्वी बाणस्तारी येथे जलवाहिनी फुटली होती पाठोपाठ ही दुसरी घटना आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर बिल्डर इमारतीच्या शेजारी खोदकाम करीत होता. याविषयी चौकशी केली असता कंत्राटदाराकडून संरक्षण भिंत बांधण्यासाठी खोदकाम चालू होते. परंतु खोदकाम खोलात गेले असून तिथे एखादी सेपटीक टँक बांधण्याची तयारा असल्यासारखे दिसते, कारण संरक्षण भिंतीला एवढ्या खोदकामाची गरज नसते. जर येथे सेपटीक टॅक बांधणीवर मुख्य जलवाहिनी तिथे आहे. लोकांच्या आरोपाला धोका होऊ शकतो, स्थानिक पंचायत, सार्वजनिक बांधकाम खाते तसेच बेतकी आरोग्य खात्याने याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सदर पाईप लाईन फुटल्याने दोन दिवस लोकांचे पाण्याविना हाल झाले असून सदर काम लवकरच पूर्ण करण्याचे करण्यात यावे असे कुंभारजुवा, जुवे, बेतकी येथील लोकांचे मत आहे.