माळीण दुर्घटनेतील मृतांचा आकडा १०३

0
101

पुणे नजीकच्या माळीण गावावर डोंगरकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या १०३ बनली आहे. काल ढिगार्‍याखालून २१ मृतदेह काढण्यात आले. दरम्यान, अजून १३०जण बेपत्ता असल्याचे कळते. दरम्यान, ढिगार्‍याखालनू एकुण २३ जणांना वाचवण्यात आपत्कालीन प्रतिसाद दलास यश आले आहे. यात एका ३ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. बुधवारी सकाळी डोंगरकडा कोसळून २०० लोकवस्तीचा हा गाव पूर्णपणे गाढला गेला होता.