पुणे : मालीण गावावर डोंगरकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत काल सहाव्या दिवशीपर्यंत १३० मृतदेह ढीगार्याखालून काढण्यास बचाव दलास यश आले. आणखी मृतदेह असल्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहेत. सापडलेल्या मृतदेहांत ५० पुरुष ५१ स्त्रिया आणि १९ मुलांचा समावेश आहे. अद्यापपर्यंत गाडली गेलेली ३३ जनावरेही सापडली आहेत.