मालमत्तेच्या वादातून मारहाण; पोलिसांकडून 2 जणांना अटक

0
8

हणजूण येथे मालमत्तेच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली. या घटनेत वडील आणि मुलगा हे दोघे जखमी झाले. ही घटना गुरुवारी घडली होती. या प्रकरणी मेविल्टन थिओदोर याने हणजूण पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर दिगंबर साळकर (74, रा. धुळेर, म्हापसा) व अखिल टिकेकर (33, रा. कुचेली-म्हापसा) या दोघांना काल अटक करण्यात आली.

या मारहाण प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असून, त्यांनाही लवकरच अटक करण्यात येणार आहे, पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सदर तक्रारीत ब्रुनो डिसोझा व इतरांकडून मारहाण केल्याचे मेविल्टन थिओदोर यांनी नमूद केले आहे. हल्लेखोरांनी मेविल्टन थिओदोर व त्याच्या वडिलांनाही मारहाण केली असून, दोघांना उपचारासाठी गोमेकॉतून मणिपाल इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. ब्रुनो डिसोझा याच्याकडूनही मेविल्टन याच्या विरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.