राज्य सरकारच्या महसूल खात्याने गोव्यातील मालमत्तेच्या खरेदी नोंदणीसाठी सुधारित मुद्रांक शुल्क दर काल अधिसूचित केले. त्यामुळे मालमत्ता खरेदी महागणार आहे. मालमत्तांच्या नोंदणीसाठी सुधारित मुद्रांक शुल्काची अधिसूचना महसूल खात्याचे अवर सचिव संदीप गावडे यांनी जारी केली. त्यानुसार ५० लाखांपर्यंतच्या मालमत्ता खरेदीसाठी ३ टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाईल. ५० लाखांपेक्षा जास्त ते ७५ लाखांपर्यंत ४ टक्के, ७५ लाखांहून अधिक आणि १ कोटीपर्यंत ४.५ टक्के, १ कोटींहून अधिक आणि ५ कोटीपर्यंत ५ टक्के आणि ५ कोटींहून अधिक मालमत्तेच्या खरेदीसाठी ६ टक्के मुद्रांक शुल्क आकारले जाईल.