मार्च 2026 पर्यंत छत्तीसगड नक्षलवाद्यांपासून मुक्त ः शहा

0
2

31 मार्च 2026 पर्यंत छत्तीसगडला नक्षलवाद्यांपासून मुक्त करू. छत्तीसगड नक्षलमुक्त होताच देशभरातून नक्षलवाद संपेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रायपूर येथील प्रेसिडेंट पोलिस कलर अवॉर्ड कार्यक्रमात सांगितले. छत्तीसगड पोलिसांनी एका वर्षात ते पूर्ण करण्याचा निर्धार केला असल्याची माहिती त्यांनी पुढे बोलताना दिली.

गृहमंत्री शहा यांनी नक्षलवाद्यांना आवाहन करताना, आमच्या सरकारने खूप चांगले आत्मसमर्पण धोरण बनवले आहे. तुम्ही मुख्य प्रवाहात सामील व्हा. शस्त्र सोडा. विकासाच्या वाटेवर या असे म्हटले आहे. सरकार बदलल्यानंतर टॉप 14 नक्षलवाद्यांना निष्प्रभ करण्यात आले आहे. 4 दशकांत प्रथमच नागरिक आणि सुरक्षा दलांच्या मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. 10 वर्षात नक्षलवादाला आळा बसला. छत्तीसगडसह सर्व
राज्यांमध्ये नक्षलवादाच्या विरोधात एका वर्षात अंतिम खिळा मारण्याची तयारी पोलिसांनी केली असल्याचे मंत्री शहा यांनी यावेळी सांगितले.