मायरन रॉड्रिग्स याची 3 कोटींची संपत्ती जप्त

0
5

राज्यातील अंदाजे 130 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणामध्ये सुमारे 3 कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास आता गुन्हा अन्वेषण विभागाकडून केला जाणार आहे. या प्रकरणाचा तपास केलेल्या आर्थिक गुन्हा शाखेने मुख्य आरोपी मायरॉन रॉड्रिग्स आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची 3 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. प्रामुख्याने 3 बँक लॉकर्समधून 4.125 किलो सोन्याचे दागिने आणि मालमत्तेची आर्थिक कागदपत्रे सापडली आहेत. आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी मडगाव जेएमएफसी न्यायालयातून शोध वॉरंट मिळवले होते.