यात मेंदूतील रक्तप्रवाहात असमतोल होऊन रक्ताचा प्रवाह मेंदूच्या काही भागात वाढतो आणि काही भागात कमी होतो. रक्तप्रवाहातील या कमी-जास्तपणामुळे मेंदूत काही विशिष्ट संप्रेरकांचे स्रवण होते. या संप्रेरकांच्या असमतोलामुळे डोके एकाच बाजूस दुखू लागते.
डोकेदुखीच्या विकारांच्या आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार, १५० पेक्षा जास्त प्रकारची डोकेदुखी आहे. सामान्य डोकेदुखीमध्ये, मज्जातंतू, रक्तवाहिन्या आणि डोके आणि मानेच्या भागातील स्नायू ताणले जातात, ज्यामुळे मेंदूत रासायनिक घटकांवर ताण येऊन डोकं दुखु लागते. मायग्रेन, क्लस्टर डोकेदुखी आणि तणावामुळे होणारी डोकेदुखी या प्रकारात येतात.
मायग्रेनची शास्त्रीय लक्षणे चिंताजनक आणि डोक्याच्या एका बाजूला होणारी वेदना आहे जी काही तास ते दिवसांपर्यंत मर्यादित राहू शकते. प्रकाश, आवाज, गंध आणि कधीकधी अगदी स्पर्श करणे ही अत्यंत संवेदनशील असते. काहींना डोक्याचा मागील भाग जड होतो, मानेचे स्नायू ताठ होतात, चेहरा, हातातून मुंग्या येणं, विचित्र वास येणं, वास सहन न होणं, अस्वस्थतता, मानसिक चिडचिड वाढणं, नैराश्य, बोलताना जीभ अडखळणं, झोप न येणं, गरगरणं, अंधारी येणं, विशिष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होणं, आदी लक्षणं आढळून येतात.
सेल-आधारित थेरपी ही शरीराच्या विविध व्याधींवर उपचाराकरिता वापरली जाते. मायग्रेन आणि इतर डोकेदुखीच्या संदर्भात संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की स्टेम सेल आणि ग्रोथ फॅक्टर ऍक्टिव्हिटी न्यूरोजेनिक तक्रारींवर लक्ष केंद्रीत करून त्यावर मात करण्यास फायदेशीर ठरत आहे. शिवाय, मायग्रेन असलेल्या रूग्णांमध्ये एंडोथेलियल प्रोजेनिटर सेल (ईपीसी)चे कार्य कमी झाल्याचे अहवाल आहेत, जे रक्ताभिसरणातील विकृतींशी संबंधित असू शकतात. आपल्या शरीरातील मेन्स्चिमल पेशींच्या स्वयं नूतनीकरण आणि बहु-विभेदनाच्या संभाव्यतेद्वारे, ईपीसीचा पुर्ववत आणण्यास प्रभावशाली ठरत आहे.
डॉ. प्रदीप महाजन, रिजनरेटिव्ह मेडिकल रिसर्चर, मुंबई सांगतात, बदलत्या काळानुसार आजारांवर प्रभावी उपचार करण्यासाठी केवळ लक्षणांवर उपचार न करता त्या आजाराविषयी जाणून घेणे अधिक आवश्यक आहे. स्टेम सेल म्हणजे शरीरातील मूळ पेशी. या पेशी कोणत्याही प्रकारच्या नवीन पेशी निर्माण करण्यास सक्षम असतात. अनेक असाध्य रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी स्टेम सेल थेरेपी सध्या महत्वाची मानली जाते. असाध्य आजाराने ग्रस्त असणार्या रुग्णांसाठी स्टेम सेल थेरेपी आशेचा नवीन किरण घेऊन आलेली आहे. ज्या रुग्णांवर सध्या सर्व प्रकारचे उपचार करूनदेखील यश मिळालेले नाही त्यांच्यावर स्वतःच्या शरीरातून प्राप्त केलेल्या मूळ पेशींच्या प्रत्यारोपणाने उपचार केले जातात. त्यांचा आजार बरा होण्यात मदत होते.