मान्सून आगमनानंतर पावसाने मारली दडी

0
4

येथील हवामान विभागाने राज्यात मोसमी पाऊस दाखल झाल्याची घोषणा 4 जूनला केली. तथापि, मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर कमकुवत झाला आहे. राज्यातील नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. राज्यात 6 ते 9 जून दरम्यान पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात चोवीस तासांत केवळ 8.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पणजी येथे सर्वाधिक 49.2 मि.मी. पावसाची नोंद झाली. म्हापसा येथे 12.2 मि.मी., फोंडा 0.3 मि.मी., ओल्ड गोवा 5.6 मि.मी., साखळी 15.2 मि.मी., वाळपई 8.6 मि.मी., दाबोळी 7.2 मि.मी., मुरगाव 13.4 मि.मी. सांगे येथे 1.3 मि.मी. पावसाची नोंद झाली. राज्यात जून महिन्यात 22.0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.