मोसमी पाऊस आगामी ४८ तासांत मध्य अरबी समुद्र, गोवा, दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटकच्या आदी भागात पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती येथील हवामान विभागाने काल दिली. तसेच हवामान विभागाने राज्यातील काही भागात १० जूनला जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. याशिवाय ११ व १२ जूनला पावसाच्या प्रमाणात आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे.
राज्यात चोवीस तासात पावसाच्या प्रमाणात थोडी वाढ झाली आहे. फोंडा, वाळपई, काणकोण आणि सांगे येथे प्रत्येकी १ सेमी. पावसाची नोंद झाली. केपे, मुरगाव, मडगाव, ओल्ड गोवा, साखळी आदी ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. अनुकूल परिस्थितीच्या अभावामुळे मोसमी पाऊस कर्नाटक राज्यात गेले दहा दिवस अडकून पडला आहे. हवामान विभागाने पावसाबाबत पिवळा अलर्ट जारी केला आहे. मध्य अरबी समुद्रातील काही भाग, गोवा, दक्षिण महाराष्ट्रातील काही भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, दक्षिण आंध्रप्रदेश आदी भागात पुढे सरकण्यासाठी मोसमी पावसाला परिस्थिती अनुकूल आहे.