मानव हक्क आयोगाचा अध्यक्ष 3 महिन्यांत नेमणार

0
5

गोवा मानव हक्क आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती येत्या 3 महिन्यांत करण्यात येईल, अशी ग्वाही राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात काल दिली. गोवा मानव हक्क आयोगाचे अध्यक्षपद गेल्या फेब्रुवारी 2023 पासून रिक्त आहे. आयोगाच्या अध्यक्षाची नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती न्यायालयात देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली जाते.