मानव संसाधन विकास महामंडळाचा प्रशिक्षण वर्ग

0
19

काणकोण येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे गोवा मानव संसाधन विकास महामंडळाच्या हाऊसकीपिंग, अटेंडंट (उपयुक्तता) साठी दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. हा वर्ग प्रधानमंत्री कौशल विकास योजने अंतर्गत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यशाळेत सुमारे २४ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. प्रशिक्षणार्थींना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या, प्राचार्याहस्ते किटचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रुप इंस्ट्रक्टर, रमेश वेळीप, जीएचआरडीसीचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी पांडुरंग पागी, ट्रेनर टेसी जोसेफ, समन्वयक ब्रॅन्डिझा फुर्तादो, नोडल अधिकारी सायली प्रभुदेसाई उपस्थित होत्या. सुरवातीस प्रा. सम्राट गांवकर यांनी स्वागत केले व वर्गाची माहिती दिली.