मानव विरहीत वीज उपकेंद्रे उभारण्याचा प्रस्ताव ः काब्राल

0
254

राज्यात मानव विरहीत वीज उपकेंद्रे उभारण्याचा प्रस्ताव असून तुये, वेर्णा आणि साळगाव येथील नियोजित २२० केव्हीए वीज उपकेंद्रे उभारण्यासाठी जारी केलेल्या निविदा रद्द करण्याची विनंती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे, अशी माहिती वीज, अपारंपरिक ऊर्जा मंत्री नीलेश काब्राल यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

३ वीज केंद्रांवर २०० कोटी खर्चणार
देशभरात नवीन अत्याधुनिक यंत्रणांच्या साहाय्याने मानव विरहीत वीज उपकेंद्रे उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्याच धर्तीवर गोव्यात अत्याधुनिक साधन सुविधांचा वापर करून मानव विरहित वीज उपकेंद्र उभारण्यासाठी विचार विनिमय करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील तुये, वेर्णा आणि साळगाव येथील नवीन २२० केव्हीए वीज केंद्राच्या बांधकामावर सुमारे दोनशे कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. मोपा येथील विमानतळासाठी तुये येथून वीज पुरवठा करण्यात येणार आहे. तुये येथील नवीन वीज केंद्राबाबत एक तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीनंतर वीज केंद्र उभारण्याबाबतच्या निविदांचा अभ्यास केला. त्यावेळी आगामी ५० वर्षासाठी निविदेमध्ये प्रस्तावित केलेल्या साधन सुविधांनुसार योग्य प्रमाणात वीज पुरवठा केला जाणे शक्य होणार नसल्याचे आढळले. सध्याच्या निविदेमध्ये २० टक्के खर्च वाढविल्यास अत्याधुनिक केबल व साधन सुविधांचा वापर करून मानव विरहीत वीज केंद्र उभारले जाऊ शकते.