माध्यम प्रश्‍नामुळे अस्वस्थ : पर्रीकर

0
48

पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षण हे फार महत्त्वाचे असून त्यामुळेच माध्यम प्रश्‍नावरून आपण अध्यक्ष बनल्याचे ते म्हणाले. रोजच्या प्रमाणेच हलके फुलके मिष्किल भाषण करताना त्यानी वरील कबुली दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की शिक्षण क्षेत्रातील गोंधळामुळे कित्येक पिढ्यांचे नुकसान झालेले आहे.

शिक्षणक्षेत्रात राजकारण आणता कामा नये, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. शिक्षण क्षेत्रातील गोंधळ दूर करून कारभार सुरळीत करण्याच्या कामी शिक्षकांनी हातभार लावावा, असे आवाहन त्यानी यावेळी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हल्लीच निवृत्त झालेल्या ३० महाविद्यालयीन शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.