माथेफिरूने केलेल्या हल्ल्यात गिरीत पाच पोलीस जखमी

0
95

>> पोलीस उपनिरीक्षक गंभीर

 

सर्वेवाडा – गिरी येथे लोकांना त्रास देणार्‍या जेनिरोओ मिरांडा (४८) या माथेफिरूने अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर केलेल्या प्राणघातक सुरी हल्ल्यात दोन उपनिरीक्षकांसह तीन पोलीस जखमी झाले. जखमींपैकी पोलीस उपनिरीक्षक दिप्तेश शेटकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. माथेफिरू मिरांडाने केलेल्या हल्ल्यात दुसरे पोलीस उपनिरीक्षक इलिडियो फर्नांडिस यांचा अंगठा कापला गेला.
यावेळी पोलीस अधिकार्‍यांसह मिरांडाला पकडण्यासाठी गेलेले पोलीस कॉन्स्टेबल ईर्षाद वाटंजी, दिनेश गोलतकर व राजेश कांदोळकर हे तिघे जखमी झाले. या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी या माथेफिरूला अटक करून बांबोळी येथे इस्पितळात पाठवले.
जखमी झालेल्या दोन्ही पोलीस उपनिरीक्षकांना तसेच तिन्ही पोलिस कॉन्स्टेबलांना उपचारासाठी पेडे म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात नेले होते. यामध्ये दिपेश शेटकर यांच्या गालावर माथेफिरूने दगड मारला. तर उजव्या हातावर चाकू हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. तर फर्नांडिस यांच्यावर सुरी हल्ला करून त्यांच्या अंगठ्यावर वार केला. त्यांना आठ टाके पडले आहेत.
देवेश गोलतेकर, कांदोळकर व वाटंगी यांच्यावरही त्याने सुरीहल्ला केला. त्यात एकाचा हात मोडला असून एकाचा पायाला जखम झाली आहे. या झटापटीत पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून मिरांडाला अडवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांना तो ऐकेनासा झाला. त्यावेळी स्थानकांनी त्याला पकडून चोप दिला.
तत्पूर्वी मिरांडाच्या पत्नीने आपल्याला पतीने मारहाण केली असून तो सुरी घेऊन पिरत असल्याची तक्रार म्हापसा पोलिसांत दिली होती. त्या तक्रारीनुसार वरील पोलीस आपले वाहन घेऊन घटनास्थळी त्याला अटक करण्यासाठी गेले होते.
यापूर्वी दोन वर्षांपूर्वी मिरांडा याने येथील एका बेकरीला आग लावल्याप्रकरणी म्हपासा पोलिसांनी त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. या हल्ल्याप्रकरणी म्हापसा पोलीस तपास करत आहेत.