माणिकराव ठाकरे जानेवारीत गोव्यात

0
18

राष्ट्रीय काँग्रेसचे नवनियुक्त गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे नवीन वर्षात जानेवारी महिन्यात गोव्याला भेट देणार आहेत.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने गोवा प्रभारी म्हणून माणिकराव ठाकरे यांची नियुक्ती केली आहे. माणिकराव ठाकरे हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते आहेत. गोव्यातील काँग्रेस पक्षातील मरगळ दूर करण्याचे मोठे आव्हान नवनियुक्त गोवा प्रभारी ठाकरे यांच्यासमोर असणार आहे.
गोव्यातील काँग्रेसचे काही आमदार फुटून भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून काँग्रेस पक्ष कमजोर झालेला नाही. गोव्यातील मतदार काँग्रेससोबत आहेत. त्यामुळे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेसच्या सर्व जुन्या, नव्या नेत्याशी संवाद साधून योग्य निर्णय घेणार आहे, असे माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे.