माझी बस योजनेसाठी सरकारने अर्ज मागवले

0
6

काही निवडक मार्गांवरील खासगी बसमालकांच्या बसेस कदंब महामंडळाच्या ताफ्यात घेऊन त्या भाडेपट्टीवर चालवण्यासाठीच्या ‘माझी बस’ योजनेसाठी गोवा सरकारने खासगी बसमालकांकडून अर्ज मागवले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात मडगाव-काणकोण, पणजी-फोंडा-सावर्डे व मडगाव-केपे-सांगे ह्या मार्गांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या योजनेसाठीचे अर्ज नियम व अटी कदंब महामंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. या योजनेखाली कदंब परिवहन महामंडळ काही निवडक मार्गांवरील सर्व खासगी बसेस आपल्या ताफ्यात घेऊन त्या चालवण्याचा विचार करीत आहे. त्यासाठी कदंब महामंडळाने 1819 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.