माजी सरन्यायाधीश सदाशिवम केरळचे नवे राज्यपाल

0
95

विरोध डावलून केंद्र सरकारने केरळचे नवे राज्यपाल म्हणून माजी सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. राज्यपालपदी नियुक्त केले जाणारे सदाशिवम (६५) हे पहिलेच माजी सरन्यायाधीश आहेत. रालोआतर्फे या पदासाठी निवडण्यात आलेले ते पहिलेच राजकीय नसलेले व्यक्ती आहेत. ते यंदा एप्रिलमध्ये निवृत्त झाले होते. सोहराबुद्दीश शेख बनावट चकमक प्रकरणी अमित शहाविरुद्धचे सीबीआय एफआयआर सदाशिवम यांनी रद्द केले होते. दरम्यान, केरळच्या राज्यपाल शीला दीक्षित यांनी गेल्या आठवड्यात राजीनामा दिला होता.