माजी लष्कर प्रमुख जनरल (निवृत्त) आणि पंजाबचे माजी राज्यपाल सुनिथ फ्रान्सिस रॉड्रिग्स यांचे काल निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. गेल्या १५ दिवसांपासून पणजीतील इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
एस. एफ. रॉड्रिग्स हे मूळचे गोव्याचे. त्यांचा जन्म १९३३ मध्ये मुंबई येथे झाला. त्यांचे बारावीपर्यंत शिक्षण देखील मुंबईतच झाले. रॉड्रिग्स हे १९९० ते १९९३ दरम्यान भारतीय लष्कराचे प्रमुख होते. तसेच २००४ ते २०१० दरम्यान ते पंजाबचे राज्यपालही होते.