सध्याच्या नरेंद्र मोदी सरकारात मंत्री असलेले माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांचा सुखना भूघोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय लष्कर सेना लवादाने व्यक्त केला आहे. लवादाने लेफ्ट. जन. पी. के. रथ यांना या खटल्यातून निर्दोेष मुक्त केले. कोर्ट मार्शल खटल्यात लवादाने नमूद केले की, जन. सिंग यांच्या षड्यंत्रात लेफ्ट. जन. रथ विनाकारण फसले. माजी लष्कर प्रमुख काही अधिकार्यांशी सुडाच्या भावनेने वागत होते, असेही लवादाने नोंद केले.