माजी मंत्री शिवदास शेट वेरेकर यांचे निधन

0
16

माजी मंत्री, फोंड्याचे माजी आमदार तथा उद्योजक शिवदास शेट वेरेकर (८६ वर्षे) यांचे सिल्वानगर, फोंडा येथील निवासस्थानी अल्प आजाराने काल सकाळी निधन झाले. मगोपच्या उमेदवारीवरून शिवदास वेरेकर फोंडा मतदारसंघातून १९८९ आणि १९९४ या दोन विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी राज्याचे मंत्रिपद भूषविले होते. फोंडा मतदारसंघातील विकास कामात त्यांनी योगदान दिले होते. आमदार असताना त्यांनी फोंडा परिसरात सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केले होते. कृषी मंत्री रवी नाईक, आमदार विजय सरदेसाई, माजी मंत्री, मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, माजी सरपंच माधव सहकारी, उद्योजक संदीप खांडेपारकर, नगराध्यक्ष रितेश नाईक व इतरांनी वेरेकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘ते’ कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस राजेश वेरेकर यांचे वडीत होत.