आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये दिनेश मोंगिया या माजी क्रिकेटपटूसह २ कॉंग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी काल मंगळवारी भाजपात प्रवेश केला. यावेळी केंद्रीयमंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची प्रमुख उपस्थिती होती. दिनेश मोंगिया हा ४४ वर्षीय डावखुरा फलंदाज पंजाबमधील आहे. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनेश मोंगियाचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे.
याशिवाय विद्यमान कॉंग्रेस आमदार फतेहसिंग बाजवा आणि बदविंदर सिंग लड्डी यांनीदेखील भाजपात प्रवेश केला आहे. दरम्यान, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि माजी केंद्रीय मंत्री सुखदेवसिंग धिंडसा यांनी नुकतीच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक केली. या बैठकीनंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी भाजपासोबत आगामी निवडणुकीतील युतीची अधिकृत घोषणा केली. यानंतर आता कॉंग्रेस आमदारांचा आणि माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यांचा भाजप प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.