राज्यात मागील पंधरा दिवस मोसमी पावसाचे प्रमाण कमी नोंद झाले असून, या पंधरा दिवसात एकूण 5.62 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण 101.31 इंच पावसाची नोंद झाली असून, पावसाचे प्रमाण आत्तापर्यंत 11.7 टक्के जास्त आहे. राज्यात 22 जून ते 28 जुलै या काळात जोरदार पावसाची नोंद झाली. त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होत गेले.