राज्यात ऑगस्ट महिन्यातील पहिल्या पंधरा दिवसात पावसाचे प्रमाण खूपच कमी नोंद झाले असून, गेल्या पंधरा दिवसांत केवळ 3.62 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण 101.48 इंच पावसाची नोंद झाली असून, राज्यातील पावसाचे प्रमाण 7.1 टक्के एवढे जास्त आहे. राज्यात 22 जून ते 28 जुलै या काळात जोरदार पावसाची नोंद झाली. या जोरदार पावसामुळे पावसाचे प्रमाण जास्त नोंद झाले होते. आता पावसाने उसंत घेतली असली तरी, पावसाचे सरासरी प्रमाण अजूनपर्यंत जास्त आहे. साळावली, गावणे, पंचवाडी, चापोली, आमठाणे ही राज्यातील पाण्याची प्रमुख धरणे पाण्याने भरली आहेत. अंजुणे धरण 93 टक्के भरले आहे. राज्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी त्याचा शेतीवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती कृषी खात्याच्या सूत्रांनी दिली.