मागील ९ दिवसांत १० इंच पाऊस

0
12

राज्यात सप्टेंबर महिन्यात मागील ९ दिवसात सुमारे १०.३० इंच पावसाची नोंद झाली असून, गेल्या चोवीस तासांत १.१६ इंच पावसाची नोंद झाली. मागील दिवसातील पावसामुळे पावसाच्या तुटीचे प्रमाण आता ७ टक्क्यांवर आले आहे. राज्यात आत्तापर्यंत १०५.०८ इंच पावसाची झाली आहे.

राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. या महिन्यात केवळ १४ इंच पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे पावसाच्या तुटीचे प्रमाण वाढले होते. राज्यात ७ सप्टेंबरपासून पावसाचे प्रमाण वाढले आहे. हवामान खात्याने सप्टेंबर महिन्यात व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात चोवीस तासात १.१६ इंच पावसाची नोंद झाली असून, राज्यातील सर्वच भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली. वाळपई येथे सर्वाधिक २.५२ इंच पावसाची नोंद झाली, तर मडगाव येथे १.७५ इंच, साखळी येथे १.७४ इंच, म्हापसा येथे १.७४ इंच, सांगे येथे १.२३ इंच, केपे येथे १.२२ इंच, फोंडा येथे १.२२ इंच, पेडणे येथे १.०५ इंच आणि काणकोण १ इंच पावसाची नोंद झाली.