माऊंट मेरीला सेंट जोसेफ वाझ चषक

0
112

माऊंट मेरी हायस्कूल चिंचणीने अवर लेडी मदर ऑफ पूअर हायस्कूल तिळामोळचा टायब्रेकरवर ५-४ असा पराभव करत पाचव्या सेंट जोसेफ वाझ फुटबॉल स्पर्धेचे विजेेतेपद पटकावले. १७ वर्षांखालील मुलांसाठी माऊंट मेरी एज्युकेशनल कॉम्प्लेक्स चिंचणी यांनी अवर लेडी ऑफ होप चर्च मैदान चिंचणी येथे या स्पर्धेचे आयोजन केले होते. निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत होता. टायब्रेकरवर माऊंट मेरीकडून शारियो गोम्स, दीपक परवार, सिड्रॉय परेरा, प्रेम बुक्कम व लारसन रिबेलो यांनी तर पुअरकडून सेलगेव डायस, जॉर्डन फारिया, मिकी डायस व गॉडविन डिकॉस्टा यांनी गोल केले. विजेत्या संघाने १० हजार रुपयांची कमाई केली तर उपविजेत्यांना ८ हजार रुपयांवर समाधान मानावे लागले. बक्षीस वितरण समारंभाला जीएफए अध्यक्ष चर्चिल आलेमाव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. फ्रांको मार्टिन्स, ट्रेव्हर बार्रेटो, फ्रान्सिस फर्नांडिस, फा. जुझे आंतोनियो दा कॉस्ता, फा. जोयसम डिसोझा, फा. स्टीफन रिबेलो, जॉन्सटन रिबेलो, मारियो वालिस, मिलाग्रीस सिल्वा आदी मान्यवरदेखील व्यासपीठावर उपस्थित होते. वैयक्तिक बक्षिसे ः अंतिम सामन्यातील सर्वोत्तम मध्यरक्षक ः दीपक परवार (माऊंट मेरी), अंतिम सामन्यातील पहिला गोल ः दीपक परवार (माऊंट मेरी), अंतिम सामन्यातील सर्वोत्तम गोलरक्षक ः अंश गडकर (माऊंट मेरी), सर्वाधिक गोल ः शारियो गोम्स (चिंचणी)