मांस प्रकल्पाशिवाय गुरांच्या कत्तलीस मनाई असावी

0
66

गोरक्षा अभियानची मागणी
गोवा मांस प्रकल्प वगळता अन्य कोणत्याही ठिकाणी बकरी ईदसाठी गुरे न मारण्याची मागणी गोरक्षा अभियानने केली आहे.
उच्च न्यायालयाने बारा वर्षांवरील बैलांचीच कत्तल करण्याचा आदेश दिला आहे. गोवा मांस प्रकल्प वगळता अन्य कोणत्याही ठिकाणी बैलांची हत्या करण्यास बंदी आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचेच पालन व्हावे, असे आवाहन गोरक्षा समितीचे अध्यक्ष हनुमंत परब व कमलेश बांदेकर यांनी काल पत्रकार परिषदेत केली.
वरील मागणी धसास लावण्यासाठी समितीने ४, ५ व ६ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
कामधेनू योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसून या योजनेत देशी गायींचाही समावेश करावा, अशी मागणी बांदेकर यांनी केली आहे. पत्रकार परिषदेस विहीपचे उत्तर गोवा प्रमुख रवींद्र अहिर उपस्थित होते.