मांडवी पुलावरून उडी मारल्याने एकाचा मृत्यू

0
12

पणजी येथील मांडवी नदीवरील पुलावरून काल शुक्रवारी एका व्यक्तीने नदीत उडी घेतली. या घटनेची माहिती मिळताच पणजी पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी मांडवी नदीच्या पात्रातून त्या व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला. रणजीत केणी ( 49 वर्षे, ताळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.