मांगेली येथे कार दरीत कोसळून पाच गंभीर जखमी

0
119

मांगेली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद लुटून माघारी परतत असताना मांगेली कुसगेवाडी तिठा येथे चालकाचा ताबा सुटून मारुती व्हॅन दरीत कोसळली. या अपघातात पाचजण पर्यटक गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. ही गाडी (जीए ०२ ८९४१) गोवा नोंदणीची आहे.
दोडामार्ग पोलीस निरीक्षक मांगेली येथे पहाणी करण्यासाठी गेले होते. काल रविवार असल्यामुळे पर्यटकांची संख्या लक्षणीय होती. सकाळपासूनच रस्त्यावर पर्यटकांच्या वाहनांची रांगा लागल्या होत्या. पर्यटन स्थळी पार्किंगची सुविधा अपुरी असल्यामुळे गाड्या रस्त्याच्याच बाजूने लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीची कोंडी वाढत होती. संध्याकाळी पर्यटक आनंद लुटून घरी निघत असताना हा अपघात झाला. त्यावेळी घटनास्थळी पोलिसाने घटनेचे गांभीर्य ओळखून जखमी पर्यटकांना गोवा येथे हलविण्यात आले.